STORYMIRROR

ashish dhabale

Tragedy

3  

ashish dhabale

Tragedy

चिमणी

चिमणी

1 min
183

विसरली जगणे खुशाली मानवा गगनात चिमणी

आज करणीने जगाच्या धाडली स्वर्गात चिमणी


हरवले अंगण घराचे वाळवण बाहेर गेले

वाळवण टिपण्यास तेव्हा यायची दारात चिमणी


रोज येऊनी घरी ती आरसा नुसताच पाही

काल अस्तित्वास अपुल्या पाह्यची काचात चिमणी


झाड मोठे तोडले अन स्वच्छता केली घराची

त्याच झाडावर सुखाने राह्यची खोप्यात चिमणी


मी गुराढोरास विकले टाकला तोडून गोठा

ती किडे अन मच्छरांना खायची गोठ्यात चिमणी


त्या चिऊ अन कावळ्याची गोष्ट आता सांग आजी

बस कथेचा भाग झाली लाडकी साऱ्यात चिमणी


हाक लाडाने कधी मी पोटच्या पोरीस देतो

ती पुढे येताच निघते साद या ओठात चिमणी


मानवा सवयी तुझ्या ह्या जीवघेण्या फार आहे

त्याच सवयीने बिचारी आणली धोक्यात चिमणी


लावला फोटो तिचा मी दावण्या नाता सुनांना

तसबिरीमध्येच दिसते आजच्या वाड्यात चिमणी


Rate this content
Log in

More marathi poem from ashish dhabale

Similar marathi poem from Tragedy