Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Tragedy

4.8  

Neha Ranalkar

Tragedy

निद्रानाश व श्यामच्या आईची गाथा

निद्रानाश व श्यामच्या आईची गाथा

1 min
241


अशी कशी अवेळी मला सोडून तु गेलीस?

भर माध्यान्ही एकटीस या भर काळोख्या रातीस||१


तुझ्याशिवाय मला प्रत्येक क्षण युगासम वाटे|

अनामिक हुरहुर चिंता व भिती ऊरात दाटे||२


नको त्या गत आठवणींचे मम ह्रदयी बोचती काटे|

विचारां मागे स्मृतींनाही नव नवीन बघ पालवी फुटे||३


माझ्या विकारावर तुचअसे गं एक खरा उपाय|

विना तुझ्या जीवन जगणे होते अशक्य प्राय ||४


लेकरास हवी माय जशी लागे वासरास गाय|

शिवाय त्यांच्या जीवन दोघांचे शुन्यवत होय||५


मला हवी हो आजही अंगाई गात जोजवणारी आई|

स्वत: राहून जागी जी मज ममतेने थोपटीत राही||६


साथ देई मज विसरण्यास तिला निद्रादेवी माई|

तु सा-या दु:ख वेदनांवर रामबाण इलाज गं होई||७


बोलावू तुज आता मी गडे गं कोणत्या उपायी?

तुजविण मजला येथ कोणी वाली उरला नाही||८


प्रतिक्षेत तुझ्या मी रात्रंदिन जाग जाग जागते|

स्वप्नांत ही तुच येण्यास मज तुझीच गरजभासते||९


जागे राहुनी कोण मज स्नेहे थोपटीन आई?

लावूनी काजळ तीट माझी दृष्ट काढेन बाई||१०


स्वामी तिन्ही जगाचा होय आई विणा भिकारी|

स्मृती दाटता तिची का मज होय शोककारी?||११


शिवबा तुझ्याच संस्काराने झाला गं छत्रपती|

शाम सानेगुरुजी झाले नावे सांगु तरी किती?||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy