तिचं अस्तित्व गहाण झालं
तिचं अस्तित्व गहाण झालं
काल पाहिलं मी तिला
दबक्या पावलांनी चालतांना
गळ्यात छोटीशी पिशवी
अन कोणाशी तरी बोलतांना
भीक मागत होती ती
पोरं पोरकी झाली होती
म्हणून तिनं सरकार दरबारी
कर्जाची फाईल नेली होती
सरकारी माडीच्या पायऱ्या
साऱ्या झिजल्या होत्या
रोज आसवांनी तिच्या
साड्या भिजल्या होत्या
अनाथ झाली होती
ती या नरभक्षी जगात
कारण तिचा आधारवड
फास लावून गेला होता ढगात
वावरात काय राहील नव्हतं
काळजाला लागलेली आग
अन शेवटी राहीलं होतं ते
तिचं कुंकू जळालं ती राख
स्वतःच असं काही उरलं नव्हतं
सारं स्वप्नं मातीमोल झालं व्हतं
वशिला लावता लावता तिचं
होतं ते अस्तिव गहाण झालं व्हतं
