STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy Others

4  

Savita Jadhav

Tragedy Others

आत्म्याची तळमळ

आत्म्याची तळमळ

1 min
623

ऐक ना..

मला काही बोलायचय,

मनातलं काहीतरी सांगायचय.


खूपच जीव लावला होता तुला,

    वाटलं होतं जीवाची राणी करावं,

         तुझ्या नि माझ्या प्रेमळ नात्याला,

               एका अतूट बंधनात बांधावं....

केली होती गं सगळी तयारी,

    पण वेळच अशी आली...

         तुझ्या पर्यंत पोचण्याआधीच,

              यमराजाची स्वारी समोर हजर झाली.

सगळं घडलं एका क्षणात,

    घडला जेव्हा तो अपघात,

         नियतीने केला घात...

              सुटली तुझी नि माझी साथ.

सगळं सुनंसुनं झालं..

    सोडून गेला माझा श्वास मला,

         शरीराची लागली विल्हेवाट,

              पण आत्मा तळमळत राहिला.

ऐक राणी...

आत्मा माझा तळमळतोय,

    झुरतोय गं तुझ्यासाठी...

         नको आठवणीत रडत बसू

               नको राहूस उदास एकटी.

आयुष्य कर नव्याने सुरु,

    माझं मन तुझ्या सोबत आहे,

         तुझ्या सुखात माझं समाधान,

              आसमंतात मी जगत आहे.

              आसमंतातून बघत आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy