तुझ्या हसण्यासाठी
तुझ्या हसण्यासाठी
ओघळणाऱ्या अश्रुंना आता
स्वतःच मी पिऊ लागलो..
नजरेत तुझ्या आनंद बघण्या
क्षणोक्षणी तुज आठवू लागलो..
मुका होऊन मग मी
जाताना तुज पाहू लागलो..
हसर्या तुझ्या नयनांसाठी
मनास तीर मारु लागलो..
वाट पाहतो चातकासम
तुझ्या बेधुंद बरसण्याची..
इच्छा मज आहे आता
सुकल्या फुला पुन्हा फुलण्याची..
काटे टोचले आता हृदयाला
घायाळ मी होऊन गेलो..
फुलासारखे जपण्या तुला
तू येण्याची वाट पाहू लागलो..
जरी जळाले हृदय माझे
तुज प्रकाश देण्यासाठी..
प्रत्येक श्वास झगडतो आता
तुझी वाट पाहण्यासाठी..
निरोप घेतो आता तुझा
अखेरीस तू परतण्यासाठी..
मरणही रुसले आता माझे
तुझ्या एका हसण्यासाठी..
