गांंधीजी!
गांंधीजी!
गांधीजी! गांधीजी!
इथे माजलाय हाहाकार
आपल्या भारतात चाललाय हिंसाचार
दिसायला आहे जरी सारे संत
तेच करतात माणुसकीचा अंत
कण अन कण रक्ताने माखलय
चोहिकडे आतंक माजलाय
हिमालय आज लाल झालाय
सागरात आज सुर्य बुडालाय
स्त्रीयत्व इथे नागड केलं जातय
पुरूषार्थ मर्यादा ओलांडतय
उघडी नागडी पोर भुके ने मरतात
मोठमोठ्या समारंभात अन्न वाया घालतात
अहिंसा, सत्य लयास गेली
माणुसकी अस्ताला आली
गांधीजी! गांधीजी!
सोप्पे आहे हो सारे
प्रेत जाळायला आज ईथे
चितेची गरज भासत नाही
घर जाळले की
जाळली जातात माणसेही
