महापूर
महापूर
असा अवकाळी पाऊस
त्याने कहर मांडला
वर्षानुवर्षे जपलेला संसार
एका घडित मोडिला
खचलेली घरे पाहून
त्यांची मनेही खचली
मिळाया आधार
नजर सर्वत्र फिरली
पाणी असे जीवन
परि शब्द वाटे अर्थहीन
पुढे अफाट ते दिसे
परि उरात तहान
पावसाने असा त्याचा
भलता रूबाब दाविला
रंकासंगे राव इथे
उपाशी राहिला
किती जीव त्याने
पोटामध्ये ढकलले
ज्यांचे नशीब चांगले
ते पुरातून बचावले
परि त्यांनाही वाटे आता
कशी करावी सुरूवात
घरटे पुन्हा उभारण्या
कोणी देइल का हात?
करी एक विनवणी
डोळे आटलेलं पाणी
येऊ नये महापूर
मोडू नये हा संसार