STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Romance Tragedy

4  

पद्मवैखरी ठाकरे

Romance Tragedy

दुराव्याचे शौर्यगीत.....

दुराव्याचे शौर्यगीत.....

1 min
367

तुला विसरण्याचे बहाणे कित्येक झाले आता

पण तुझ्या आठवणीचेही क्षण राहिले नाही


सोडविताना हात तो गहिवरले होते विचारही

जगण्यास आता मनाचा ओलावा उरला नाही


धागा माझ्या प्रेमाचा गुंतलाच नाही आपल्यात

पण साधा शब्दगंधही तुला कधी मोहलाच नाही


प्रश्न कितीतरी अजूनही आहे अनुत्तरितच माझे

उत्तराची वाट तुला कधी त्यांची मिळालीच नाही


मिठी शेवटची जरा ती का जाणे बोचरी वाटली

पण अजूनही तिची ती सल कमी झालीच नाही


वर्षागणिक दिवस मोजत गेले सरणावरती तरी

पण श्वास शेवटचा अजूनही सुरळीत झाला नाही


किती सहज होते शोधणे प्रेमाच्या सुखालाही पण

इश्काच्या पावसात साधे तुला भिजता आले नाही


दुराव्यासाठी लाख आरोप असतील तुझे माझ्यावर

पण पुरावा माझ्या सोबतीचा तुझ्याकडे एकही नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance