नवीन वर्ष.
नवीन वर्ष.
...सरत्या वर्षाला निरोप
देण्याची एक प्रथा असते...
पण उलट त्या calendar मागे
प्रत्येकाची छोटिमोठी कथा असते......
...काहितरी सांगायचंय असते
इथं येणार:या जाणार:याला ...
कुणी भुकेने तडफडणार:या
गरिबांना तर कधी hotel मध्ये
रात्री पार्टित दारू पिणार:याला.....
...एका सेकंदात येईल
आत्ता नवीन एक दशक
फटाके फुटतील रोशणाई
होईल सर्विकडे चकचक.....
..पण मरणासन्न थंडीत घालायला
कपडे नाहि त्यांचे काय. ..
इथे तर आपण अंगभर कपडे
वरुन साॅक्स नि झाकतो पाय....
..हे पार्टि करणे वाटतो
कधीकधी वाटतो भोगवाद...
कसल्या ह्या संस्कृती चा
लागलाय खुळा नाद...
..अरे देवा मंदिरावर तुझ्या तर
सोन्याचे कळस आहे चढलेले...
तरी पण काहि लोकांसाठी तिथे
" entry " चे गेट पाडलेले...
इतकि मनोमन भक्तिभावाने
पुजा करणार्या भक्तांना
का रे संकटानी वेढलेले...
