खरा भाग्यवान !
खरा भाग्यवान !
शैशवच माझे सारे
गेले दु:खात न्हाऊन,
जेव्हा माय-बाप गेले
मज एकटा टाकून,
झाल्या अतीव वेदना
केला पोटाने इशारा,
नको गाळू अश्रू आता
विसर त्या जळधारा,
मन माझे धीट केले
कष्ट सारे मी झेलले,
जीवन कसे जगवावे
मना मीच शिकविले,
ते सोडूनी मज गेले
परि उणीव भासते,
माय-बाप नि लेकरू
कसे रेशमी हे नाते,
आज आहे जगति या
सर्व आभासमान,
ज्यास आहे माय-बाप
तोच खरा भाग्यवान !
