STORYMIRROR

Mrs Trupti Waingankar

Inspirational

4  

Mrs Trupti Waingankar

Inspirational

जीवन गाणे गातच रहावे ......

जीवन गाणे गातच रहावे ......

1 min
268

उन्मुख कळीतून 

सुगंध पसरण्या ,

जसे फूल फुलावे ! 

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे......


ओंजळीतील क्षणात सुख शोधून 

मानावं दुःखही आंदण ,

काळरातीतही शोधावं सुखाचं चांदणं !

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


पुसुनी गेल्या पाऊलखुणा ज्या 

वाटेवरी त्या .........

न पुन्हा परतुनी पहावे !

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


सुख -दुःखाची जणू श्रृंखला

 ऊन-पाऊसाचा हा खेळ आगळा ,

कधी किनारी राहून क्षितिज न्याहाळावे !  

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


मावळतीच्या आड़वाटेला 

जगरहाटीच्या या लाटेला ,

निःशंक सामोरे जावे !

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


नयनातूनी ओघळणाऱ्या दुःखाचे 

मोती अलगद टिपावे ,

असंख्य काट्यातूनही 

सुखाचे एक फूल वेचावे !

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


गीत सुखाचे नि दुःखाचे 

शोभून दिसते प्रत्येकाच्या ओठी ,

भासले जरी.........

तरी जीवन नसते अपुले - अपुल्यासाठी ! 

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


जीवन अपुले करावे अर्पण 

उरावे कणकण , प्रत्येकाच्या हृदयी ,

तो स्वर गीतांचा निनादेल मग 

दाहीं दिशांच्या ठायी !

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


उन्मुख कळीतून 

सुगंध पसरण्या ,

जसे फूल फुलावे !

जीवन गाणे गातच रहावे ,

जीवन गाणे गातच रहावे .........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational