एक पाऊस असाही......
एक पाऊस असाही......
1 min
515
एक पाऊस असाही......
रिमझिम धारांनी बरसणारा,
कोमजलेल्या धरतीचं रूप
क्षणार्धात पालटणारा,
एक पाऊस असाही......
पहिल्या थेंबासाठी आसावलेला,
वाट पाहणाऱ्या चातकाच्या
क्षणात चोचीत विसावलेला,
एक पाऊस असाही......
भेटीसाठी आतुरलेला,
आभाळ-धरतीच्या मिलनासाठी
क्षितिज स्वप्नात रेंगाळलेला,
एक पाऊस असाही......
दिवसा स्वप्नात रंगविणारा,
भूतकाळातील आठवणींना
पुन्हा मनात जगविणारा,
एक पाऊस असाही......
आसवांशी नातं असलेला,
सुख-दुःखाच्या सागरात
अगदी खोल रुतलेला............
