STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

गझल लोकस्वभाव

गझल लोकस्वभाव

1 min
664

खावून शेत कुंपण देऊन घाव गेले

पाठीत घाव मारत सारेच साव गेले


स्वस्तात सर्व राशन देतो म्हणून नेते

मारून थाप पोकळ जिंकून डाव गेले


मोठे भयाण वादळ येऊन काल रात्री 

एका क्षणात केवळ बुडवून नाव गेले


नाजूक ओठ कोमल बोलून गोड भाषा

लावून नेम लोचन उडवून गाव गेले 


लावून रोज चंदन घालून माळ मोठी

मारून काल बोकड हाणून ताव गेले


प्रेमात काल साजण देऊन प्राण आला

आई वडील वाहत अश्रूंत राव गेले 


अश्रूंत चिंब जीवन घायाळ वेदनांनी

कमलास लोक पंकज ठेऊन नाव गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy