Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sarika Jinturkar

Tragedy Others

3.7  

Sarika Jinturkar

Tragedy Others

निरोप...

निरोप...

1 min
178


निरोप देण्यास आम्हाला

जमले होते विद्यार्थी सारे

वाहतील चहू दिशेनी आता उदास वारे 

पाखरे ही मायेची आकाशी निघाली

येऊ नये पण, परतीची वेळ आता आली

हसलो, नाचलो, एकत्रित खेळलो

असेलही कधी झगडलो

पण पाहून इथला रंग,ढंग आम्ही इथेच घडलो 

विद्यार्थी जीवनातच आहे खरा रंग

आता पुढे जीवन आहे एक जंग

व्यक्तिमत्वाचे धडे इथेच शिकलो

गुरुजनांचे हे प्रेम विसरणे अशक्य आहे

दुःखद अश्रूंनी डोळे आज माझे भरत आहे

पक्षी जाती उडूनी झाड होईल रिते

या ओसाड वाळवंटी आता ठेवू कुणाशी नाते 

शांत होती सृष्टी सारी

स्तब्ध झाली झाडे,स्तब्ध झाल्या वेली

क्षितिजाजवळ रेंगाळलेली

किरणे ही कातरवेळी 

स्थिर झाल्या दाही दिशा

चैतन ही जणू अचल झाले

हरवून गेले निळाईत आकाश

क्षितीजही काजळून गेले

निरोप देत होती सारी सृष्टी

तेजाच्या त्या वलयाला

अशा क्षणी घ्यावा आपण ही

निरोप सहज वाटले मनाला...


Rate this content
Log in