मैफिल तिच्या प्रश्न उत्तरांची
मैफिल तिच्या प्रश्न उत्तरांची
डोळ्यातल्या भावनांना ओठावर आणले तिने
घाबरत का होईना स्वतःचे मन मोकळे केले तिने
प्रश्न आणि उत्तरांचा मग सुरु झाला प्रवास
प्रवाहाप्रमाणे वाहायचा स्वभाव तिचा खास
कोणत्याच प्रश्नांना तिने अनुत्तारित नाही सोडलं
उत्तर देता देता तिचं आयुष्य मात्र संपलं
वाहून गेलेल्या पाण्याप्रमाणे एक दिवस तीही वाहून गेली
प्रश्न उत्तरांची ही मैफिल ती गेल्यावरही तशीच सुरु राहिली
स्त्रियांच्या या जन्माला वाटतं खरंच काही किंमत नाही
तिच्या अस्तित्वाची जाणीव शेवटपर्यंत कोणालाच का नाही