कसे म्हणावे
कसे म्हणावे
गळा कापला मित्र चांगला कसे म्हणावे
घरात होता साप पाळला कसे म्हणावे
हात कुणाला मदतीचा ना दिला कधीही
समाजकार्ये करून थकला कसे म्हणावे
प्रेमात सखी सर्वस्व तुला अर्पूण माझे
तूच शेवटी गळा घोटला कसे म्हणावे
मारत सुटला दुर्बलास जो स्वार्थापायी
शक्तिमान तो राजा बनला कसे म्हणावे
लाचा घेतो इमान विकतो जर मग मंत्री
शपथेचे तो भान विसरला कसे म्हणावे
