आठवणीतला बाबा
आठवणीतला बाबा
चक्र फिरवून ये ना बाबा
काळ लोटून ये ना बाबा
उन्हाळा फार तापत आहे
पाणी बनून ये ना बाबा
कुणीच नाही माझे आता
वेळ काढून येना बाबा
पडलो होतो रडलो होतो
हळद तपवून येना बाबा
क्रिकेट जरा खेळू आता
बॅट घेऊन येना बाबा
गरम दुधात ओठ पोळले
फुंकर घालून येना बाबा
सायकल कशी पुढे चालवू
मागे धरून येना बाबा
संध्याकाळी मज करमेना
रात्र उजळून येना बाबा
मला यायला उशीर झाला
रान तुडवून येना बाबा
मजला नाही रात्री झोपा
स्वप्न होऊन येना बाबा