ऐतिहासिक लेणं
ऐतिहासिक लेणं
घडतो एका रात्रीत इतिहास।
काळा बांधून घेतो घटनेत।
साक्ष मग त्याची उरते भविष्यकाळी।
ऐतिहासिक क्षण ते होतात ते भूतकाळात।
परंपरेचा वारसा देत
तो चालती डौलात,
कालबाह्य घटनेचा,
ऐतिहासिक ताफा घेवून।
पूर्वजांच्या शौर्यगाथा।
वीरांच्या वीरकथा।
देवून गौरवगान।
महाराष्ट्र भूषवी ऐतिहासिक लेणं।
