STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational Others

4  

Varsha Shidore

Inspirational Others

ऐक माझं एकदा...

ऐक माझं एकदा...

2 mins
390

मी आरसा बोलतोय...

हो... आहे ही शर्यत 

पण तुझ्या अस्तित्वाच्या विळख्यात 

पुन्हा पुन्हा तुलाच अडकवणारी... 

नाहीच जमलं ना तुला

शर्यतीत एकसारखं धावणं 

तर थांबून घे सबुरीनं 

कधी धाव तर कधी 

फक्त चालत राहा...


हो... नकली चेहरा आहे

पण तो माझा नाहीये 

मी ते दाखवतो जे तुला 

कधीच पाहायचे नसते 

म्हणून ते खोटे, नकली 

असे हिणवले जाते... 


हे बघ... तुझा आनंद मी 

नाहीच दाखवू शकत

तो तुझ्या मनाच्या कोपऱ्यात 

खोलवर आहे दडलेला

शोधायचंय ना तुला...?

तर फक्त एक कर... 

तो आनंद तू तुझ्यात शोध 

कोणा प्रवासात नाही 

कोणा व्यक्तीत नाही 

कोणा माझ्यासारख्या निर्जीवात नाही 

खोटी आशा असते फक्त... 


कोणी मला सुख देईल 

तरच मी सुखी होईल...?

मुळीच नाही... स्वतःला ओळखणारा 

तो ‘एक’ स्वतःसाठी होणं

तर खरं आहे तुझं अस्तित्व...!


प्रश्नचिन्ह लाव हवे तर 

पण स्वतःच्या अपूर्णतेवर 

पूर्तता तर पूर्णविरामानेच होते

समाधानाची भरलेली घागर 

तू तुझ्या आनंदात शोध...!

ऐक माझं एकदा... 

स्वतःला स्वतःत शोध...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational