STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

अहो ! थोडंसं बोलायचं होतं...

अहो ! थोडंसं बोलायचं होतं...

1 min
258

अहो ! थोडंसं बोलायचं होतं

मनातलं गुपित खोलायचं होतं 

इतकं सहज सुरवंटाचे होत ना 

फुलपाखरू अगदी तसंच ... 


अहो ! थोडंसं हसायचं होतं 

पुढ्यात तुमच्या बसायचं होत 

अन् भूतकाळातल्या गोष्टी 

नातवाला आजीनं सांगावं तसं 


अहो ! थोडंसं रुसायचं होतं 

तुम्ही जरासं मानवायचं होतं 

खोटं - खोटं का होईना पण

तारुण्यसुलभ भावविश्व् थोडंसं  


अहो ! ऐकलं का असं म्हटलं ना 

की तुम्हाला राग येतो म्हणून 

भांडण - तंटे , रुसवे - फुगवे 

याची मला हौस नाही हो सांगायचं होतं


अहो ! ऐकलं का असं म्हटलं ना 

की तुमचा पारा चढतो, झालं हीच सुरु 

किराणा संपला, गॅस संपला, बरंच काही 

काय करणार हे सर्व अपरिहार्य ठरतं ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational