अहंकार
अहंकार
आज मस्तकी चढून तू बसला, समजत नाही काही.
कधी न चिडणारा मी, रागाचा त्या पारा पाही.
शिरा ताणल्या कपाळी, त्यावरती आढि पडली.
मला सवयच जरा ज्यास्त बोलायची, नेमकी आजच ती नडली.
शांत झालो कितीही, तरीही तोच विचार येतोय.
नेमके चुकले कोणाचे, आणी दोष कोणाला देतोय.
असा कसा रागा तू, मला माझ्यातून हरवलस.
कित्येक चुकीच्या शब्दांनी, किती जणांना रडवलस.
सगळेच आपली होती, पण समजून थोडी घेणारं.
प्रत्येकाची माफी मागण्यांसाठी, वेळ सुद्धा नाही मिळणारं.
तू आलास की, मनाच्या डोळ्यांना होतो अंधकार.
मी पणाचा स्वभाव माझा, हा तर माझाच अहंकार.
