अहंकार
अहंकार
*चिकटे एकदा / अहंकारी वारा /*
*नसे कधी थारा / माणसाला //१//*
*फुकाच्या शत्रूला / करा हद्दपार /*
*नको अहंकार/मनामधे //२//*
*रूजवावी अंगी / निस्वार्थी भावना /*
*सोडा अहंपणा / सकलांनी //३//*
*हरवे स्वत:ला / पोरका नात्यांना /*
*विसरूनी जना / एकटाचि //४//*
*अहंकारव्याप्त / नको ते जगणे /*
*आपणा शहाणे / म्हणू नये //५//*
*राखण्या संयम / राग नियंत्रण /*
*ऐकावे किर्तन / मनोभावे //६//*
*अहंकाररूपी / उन्मत्त भावना /*
*सोडूनी भेटना / प्रियजना //७//*
