अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकर
मराठी सत्तेचे अहिल्येने
बाळगले उराशी स्वप्न
प्रजेला सुखी करण्यात
राहत होती मग्न
अन्यायाविरुद्ध आवाज
उठवून दरारा निर्माण केला
प्रजेला त्रास देणाऱ्यांना
तोफेच्या तोंडी देत मार दिला
केला मंदिरांचा जीर्णोद्धार
पाणपोई,आश्रमशाळा उभारल्या
पक्षांच्या अन् प्राण्यांच्या सेवेसाठी
वैद्यांच्या नियुक्त्या केल्या
बाई काय राज्यकारभार करणार
बाब ही खोटी ठरवत
राज्यकारभाराचा गाडा स्वतः
कुशलपणे नेला चालवत
राज्यावर आलेल्या संकटाना
तोंड दिले तडफदारपणे
शांतता अन् सुबत्ता जपली
राज्यात काटेकोरपणे
