STORYMIRROR

Manisha Awekar

Classics

2  

Manisha Awekar

Classics

अगम्य

अगम्य

1 min
490

कधीतरी अशी अचानक

जाग यावी अवचित पहाटे

धुंद गारवा मंद मारवा

वाटे मज कसे छानसे (1)


शीतल झुळुक वा-याची

सुखवे तनमनासही

क्षितीजापार कोर मंदशी

धूसरशा अंबरामधी (2)


पूर्वेला उगवतीपूर्वीचा

गोड नारिंगी नजारा

सल्लज्ज उषेचा रक्तिमा

अभ्रांतूनी धूसरलेला (3)


शांत मन शांत पवन

मी स्वतःला निरखू पाहे

माझी मी मलाच नकळे

अलगदसे उलगडू लागे (4)


अळवावरचे पाणी जग हे

वर्तमानावरती चाले

उगाच गुंता सोडवू पाहे

जग अगम्य आजि कळले (5)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics