STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

3  

Manisha Awekar

Tragedy

अधुरी कहाणी

अधुरी कहाणी

1 min
11.7K

राजा राणी दोघे / संसार प्रेमाचा

मनोमीलनाचा / आनंदाने


वेलीवरी फूल /फुलणार आता

आनंदे भरता / येई त्यांच्या 


लाडक्या राणीचे / डोहाळे पुरवा

भर्तार आग्रहा /करीतसे


गर्भ वाढे उरी / राणी सुखावली

कांती झळाळली / गर्भ तेजे


पदार्थ आवडी / भरवी तिजला

गर्भ सुखावला / माया प्रेमे


दिन थडकला / अती दुर्दैवाचा

अंत राजसाचा / अपघाती


राणी बेभानचि / गोठलीच वाणी

अधूरी कहाणी / संसाराची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy