अबोला
अबोला
का रे हा करशी अबोला?
बोल ना एकदा सख्या रे |
जीव होतो कासावीस माझा
हा अबोला जीवघेणा रे | |१| |
नको रोज मजला चोरून
पाहू असा झाडाआडून |
हवं तितकं भांडून घे नको
घेऊस असे कान पाडून | |२| |
तुझ्याशी बोलल्याखेरीज
माझ्या जीवा नाही चैन पडत |
नको इतका भाव खाऊस जसं
काही तुझे मजवीण नाही अडत | |३| |
तुच मला आधार जगी सोड
हा अबोला गुन्हा माझा सांग तरी |
सारं झाले गेलं विसर तुझे माझे
नाते राहो अभंग जन्मजन्मांतरी | |४| |

