STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

3  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

अबोल नाते

अबोल नाते

1 min
169

लेखणी अन् माझे

अबोल नाते आहे-

प्राणाहून प्रिय

लेखणीच आहे ।।


शब्द बोलती मजला

लिहिते वेदनांना-

नवक्रांती लेखणीने

वाट भावनांना।।


सत्याची धरुनी कास

नवचेतना निर्मिते-

लेखांनीतून माझ्या

प्रसार हा करते।।


लेखणी हीच माझी

ओळख आता आहे-

तुजविण जीवन 

माझे भकास आहे।।


प्रीत लेखणीसवे 

मज जडली आहे-

सांज-सकाळी स्वप्नीही

लेखणीस मी पाहे।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational