Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

daivashala puri

Inspirational

4  

daivashala puri

Inspirational

अभंग रचना

अभंग रचना

1 min
209


गाडगे बाबांचा । वसा घेऊ मनी 

झाडू हा धरूनी । हातामध्ये ॥१॥


स्वच्छ घरदार । परीसर स्वच्छ 

विचार गलिच्छ । दूर जाती ॥२॥


झाडे लावूनिया । शुद्ध करू हवा 

निसर्गाचा ठेवा । सांभाळाया ॥३॥


पशु पाखरांची।वृक्ष ही माऊली 

निस्वार्थी सावली ।सकळांची ॥४॥


तोडू नये वृक्ष ।स्वार्थ साधावया 

जाईल हो लया ।सृष्टी सारी ॥५॥


संवर्धन करा ।आपले भविष्य 

हवेतील विष । घेई प्राण॥६॥


पाण्याचा टाळावा । सदा अपव्यय 

होईल उपाय । दुष्काळाचा ॥७॥


सकस आहार । सुदृढ जीवन 

नको रसायन । जमीनीत ॥८॥


पर्यावरणाची । ठेवावी हो जाण 

करावे जतन ।निसर्गाचे ॥९॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational