अभिव्यक्ती स्री मनाची
अभिव्यक्ती स्री मनाची
जगते मी जगविते
धागे मायेचे विणते
मी स्त्री सृष्टी म्हणविते II
सृष्टीचे सृजन अंगी
निःस्वार्थ परिभाषा मी
म्हणून स्री बोलते मी II
गृहलक्ष्मी अर्धांगिनी
सात वचने पाऊलं
सप्तपदी संगिनी मी II
तुळस रांगोळी तेज
समई वात अंगणी
मीच आदि मी अनंत II
जन्म देते लेकरा मी
उदरात नऊ मास
तृप्त मन, माझा श्वास II
मुक्या भावना अबोल
जागवते डोळ्यात मी
म्हणून स्री बोलते मी II
मीच माझी मी सामर्थ्य
गहिरेपण नात्यात
स्री जन्माची सीमा सार्थ II
विश्व मी माझ्यात विश्व use klldjjjjjjjihiuhh
मजवाचुन ना जीव
ना कुठली नीव युगी II
©दिपाली प्रल्हाद
