Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

4  

Neha Ranalkar

Inspirational

अभिमान मराठी भाषेचा

अभिमान मराठी भाषेचा

1 min
264


अभिमान मराठी भाषेचा बोलतो

वाचतो अन लिहितो ही मराठी |

नसानसात भिनलेली भाषा माझी

जगतो आणि जगवतोही मराठी | |१| |


माय मराठीची गोडी चाखायला 

भाषिक सौंदर्य हवे कळायला |

तिचे वेड लावते माझ्यासारखेच

साहित्यिकांनाही मागे पळायला | |२| |


काय अन् किती सांगू तुम्हा

अभिमान मराठीचा मी आज |

साऱ्या भाषांमध्ये निराळाच

संस्कारांचा ल्यालीय साज | |३| |


वैरभाव नाही अंतरी तिच्या करी

इतर भाषांचा सहजतेने स्विकार |

माय मराठीची महती गाण्यासाठी

असमर्थ ठरल्या भाषा चिकार | |४| |


संत ज्ञानेश्वर, मुकुंदराजसारख्या

कवींनी जपली मराठीची अस्मिता |

घेई साहित्यिकांना पदरात मराठी 

यथोचित प्रेम व सन्मान अर्पिता | |५| |


राजभाषा दिनी मराठी भाषेला

मिळो खऱ्या राजपैठणीचाच मान | 

नेसली जरतारी शालू तिला हवा

राजदरबारात यथोचित सन्मान | |६ | |


मराठीची थोरवी गाण्यांस माझे

अपुरे पडे भाषिक कौशल्य ज्ञान |

आरस्पानी सौंदर्य तिचे गातानाच

विसरायला होतं मला आत्मभान | |७| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational