STORYMIRROR

kishor zote

Inspirational

0.8  

kishor zote

Inspirational

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

1 min
27.1K


( अभंग रचना )

हेवे दावे सोडा I

जवळीक धरा ॥

बोलते ते करा I 

आपल्याला ॥१॥

नात्यात दूरावा I

कशाला असावा ? ॥

हळूच जपावा |

प्रेमभाव ॥२॥

मैत्री ती असावी I

आनंद देणारी ॥

नको पडो दरी |

अघटीत ॥३॥

निवांत पणात I

वेळ तो काढावा ॥

संपर्क वाढावा |

माणसाशी ॥ ४॥

या आयुष्यावर |

बोलू काही तरी II

जाऊ पैलतीरी I

तरुनीया ॥५॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational