आयुष्यात तुझे असणे
आयुष्यात तुझे असणे
कोठुनि आलास कळत नाही मजला
उदास माझ्या जीवाला आनंदाचा स्पर्श करुनी गेला
हृदयाच्या अंतर्मनाला काटे रुतले आयुष्यात
अलगद काटे काढुनी सुगंध देई मनाला माझ्या
काय मिळवायचे होते मला विस्मरण होई मनाला माझ्या
अलगद स्पर्श करुनी जीवनी माझ्या आनंद दिलास तू मजला
मनाहूनी वेगळी वाट ही मनाला भासते फार
हलकेच जाग मला आली धुंद तुझ्या हसण्याने फार

