आयुष्याला काय द्यावं उत्तर
आयुष्याला काय द्यावं उत्तर
मावळून गेल्या आशा सगळ्या
उडून गेल जगण्यातलं अत्तर
जगण आता शून्य झालं
आयुष्याला काय द्यावं उत्तर
काहीली काहीली झाली मनाची
हरवून गेलं भावनांचं छप्पर
जगण आता शून्य झालं
आयुष्याला काय द्यावं उत्तर
चिंध्या चिंध्या झाल्या आयुष्याच्या
लोंबू लागलं लखतर
जगण आता शून्य झालं
आयुष्याला काय द्यावं उत्तर
भोग या नशीबाचे
नाही भोगल्याशिवाय गत्यंतर
जगण आता शून्य झालं
आयुष्याला काय द्यावं उत्तर
