STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी

1 min
572

धरुनी तुझी करंगळी

नेता होतो तुला

शाळेच्या दिशेने

 कधीकाळी


तुझ्या गरजा

 पुरवण्यासाठी

रात्रीचा दिवस करूनी

अविरत कष्ट करूनी

आलो घरी वेळी-अवेळी


तुझ्या सुखासाठी पेटवली

आयुष्याची होळी

तू मात्र आपल्या स्वार्थाची

भाजून घेतलीस पोळी


दुर्दैवाने फाटकीच

ठरली माझी झोळी

दिन विकलांग अपंग मी

आयुष्याच्या कातरवेळी


विसरून पुत्र कर्तव्याला

झिडकारलेस अशावेळी

वृद्धाश्रमाची वाट दावली

आयुष्याच्या संध्याकाळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational