आयुष्याचे मातेरे ,झाले ना त्याचे ...
आयुष्याचे मातेरे ,झाले ना त्याचे ...
असे - कसे ढोंगी, मायबाप सरकार
पुंजपतींच्या पायी ,नतमस्तक झाले
सबका साथ , सबका विकास
सांगा ना विश्वास कुठे गेला ?
केवढ्या वल्गना ,किती दांडगाई ,
किती ,अट्टहास ,निरर्थकच सार
रोज मरतो अन्नदाता देणे घेणे नाही
खोटे -खोटे दावे वरतून गनिमी कावे ?
एरंडाचे गुऱ्हाळ थांबवा रे आता
बस्स झाल्या विकासाच्या बाता
तोंडचा त्याचा हिरावू नका घास
पेकाटात लाथ पडेल हमखास
नाहीतर काही होईल , तिफण थांबेल
रुम्हन हाती येईल ,.पळता भुई थोडी होईल
जाऊ द्या ना भाऊ ,अंत नका पाहू
आयुष्याचे मातेरे ,झाले ना त्याचे
