आयुष्य..!!
आयुष्य..!!


आयुष्य खरंच सोपे नसते, इथे प्रत्येक "का"ला उत्तर नसते
मागच्याच पानावरुन पुढे जायचे असते, आपले भविष्य आपणच घडवायचे असते
सुखाच्या मागे धावायचे नसते, दुःखातही आनंदाला शोधायचे असते
मनासारखे इथे काही घडत नसते, आपणच आपल्या मनाला समजवायचे असते
मागून कधी इथे प्रेम मिळत नसते, जितके मिळेल तितके पुरेसे असते
तडजोडीमध्येही समाधान असते, कोणा आपल्यासाठीच ती केलेली असते
स्वप्नभंग तर इथे होत असतात, तरी पुन्हा पुन्हा स्वप्न पाहायची असतात
कठीण ही जीवनाची वाट असते, कधी सोबतीने तर कधी एकट्याने चालायचे असते
क्षणभंगुर हे जीवन असते, तुझे माझे काही नसते
असे असले तरी या, आयुष्यावर प्रेम करायचे असते
कारण अनमोल हे जीवन पुन्हा पुन्हा मिळत नसते