आयुष्य
आयुष्य
*******************************
निघून जाते *आयुष्य*
खिसे आपले भरतांना
वेळ जाते निघून
दिवस रात्र धावताना...
*आयुष्य* काय आहे
आज कुणाला कळले नाही
जगण्याचे गुपित कोडे
कुणालाच उमजले नाही..!!
धावपळीच्या जीवनात
निघून गेले *आयुष्य*
नाही समजले माणसालाच
माणसाचे नैराश्य..!!
*****************************
