STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे

1 min
427



जीवन प्रत्येकाचेच

अनमोल भेट एक.

जाण ठेवावी सतत

कामे करावित नेक.


जीवनाचा खेळ जणू

चार घडीचाच डाव.

पहिला फासा जन्माचा

मृत्यूचे शेवटी गाव.


डाव तो बालपणीचा

खेळावयाचा सुखाने.

कुमारवयातही ते

बोल हसतमुखाने.


गृहस्थाश्रमी करावा

संसार सुखाचा थाट.

वृद्ध होताच धरावी

ईशकवनाची वाट.


डाव चार हे खेळावे

इमानाने घडीभर.

मृत्यूनंतर होईल

वाट मोक्षाची सुकर.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational