STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Classics Children

3  

शुभांगी कोतवाल

Classics Children

आवडता ऋतु - थंडी

आवडता ऋतु - थंडी

2 mins
217


पाऊस संपता संपता पडते गुलाबी थंडी ,

   ऊन, वारा, वादळ - पावसापासून मिळते मुक्ती ,


मात्र सकाळी उठून शाळेत जाणं होते कंटाळवाणे,

ऊबदार मऊ गोधडीतून नकोसं होई उठणे,


आईच्या हाकांनी डोळे चोळत जागे होणे,

त्यात ते वेळेवर शाळेत जाऊन पोहोचणे ,


लोकरीचे मऊ रंगीत स्वेटर व त्यावर मिळत को

असे रंगीबेरंगी स्कार्फ वा मॅचिंग मफलर ,


शाळेच्या सुट्टीत चिंच , बोरं , पेरू खायची असे गंमत ,

शाळेच्या पटांगणात मिळणारे ते कोवळे उन ,


घरी पोहोचता होत असू भुकेने व्याकुळ 

ताज्या हिरव्या भाज्या व गरम - गरम 

जेवल्याने होत असे मनाची तृप्ती .


संध्याकाळी खेळता - खेळता पडून 

कधी जर फुटले गुडघे तर होत असे जीव दुःखी 


थंडीने फुटणारे ओठ , हातपाय , आणि त्यावर

 ते मातीत जाऊन खेळणे , सर्वच असे कष्टदायी 

पण मनाची उमेद व सहनशक्ती याची असे साथ .


शाळेतून जाणारी सहल आणि त्यासाठी असणारी 

ती भयंकर इच्छाशक्ती व चिकाटी , 

ह्या सर्वांनी करत असू त्या थांडीवर मात.


थंडीने पसरणारे ते पहाटेचे शुभ्र धुके ,

आणि त्यात ते पाना- फुलांवर, गवतावर 

पडणारे ओले दवबिंदू , सर्वच किती सुखद असे 


त्यात ती सकाळची पडणारी कोवळी सूर्यकिरणे . 

तोंडाने आ - आ करून दिसणारी ती वाफ ,

सर्वच कसे विलक्षण व आश्चर्यचकित करणारे .


सकाळी मिळणारे डिंकाचे लाडू , बदाम काजू 

साजूक तूप , व नवनवीन न्याहारी .


त्यात येणारा तो दिवाळीचा व संक्रांतीचा सण

थंडीत कुडकुडत उठून होत असत अभ्यंगस्नान 

व होती मजा लवंगी फटाके , लडी फोडण्याची 


संक्रांतीचा तो तिळगुळाचा लाडू आणि काटेरी हलवा 

गच्चीत जाऊन पतंग उडवण्याचा तो उपक्रम 


का कुणास ठावूक मोठे होण्याबरोबर ,

लागत जातात अल्प व पूर्णविराम ,

त्या सर्व आनंद व मौजींवर , 

आणि बदलून जाते ती सर्व ऋतुंची , थंडीची गंमत 

म्हणूनच तर म्हणतात ना, " लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा " 


     




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics