आतुरता
आतुरता
आतुरता लागे जीवा
सखे भेटण्यासाठी
काढशील वेळ जरा
मज पाहण्यासाठी
दिवस किती राहिले
आता मोजण्यासाठी
मन तरसते आहे
तुला बघण्यासाठी
ध्यास लागला मनाला
तुझ्याशी बोलण्याचा
हातात हात धरुनी
थोडं बिलगण्याचा
भूतकाळातील क्षण
जोडीने आठवू या
उद्याची स्वप्नं परत
नव्याने रंगवू या