STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

आठवणींचा ढग पावसाचा

आठवणींचा ढग पावसाचा

1 min
581

हल्ली पावसाचे ढग नाही जमत

जमतात फक्त आठवणींचे मेघ!

ढग पावसाचे हवे तरी वाटतात

वाढवणार असतात जीवन रेघ!!


स्मृतींच्या मेघांत विरह जीवघेणा

प्रेमींना प्रतिक्षाच एकमेकांची!

चातकासम करायला लावणारा

जशी हल्लीच्या मृगनक्षत्रांची!!


मारुतीच्या लांबत जाणा-या

शेपटासारखीच होई अमर्याद!

निळ्या जांभळ्या मेघांना मोर

पिसारा फुलवून देती तरी साद!!


मनाच्या नभांगणी निराशेचे ढग

झाकोळून टाकतात सारे आशावाद!!!

प्रियकर वा प्रेयसीच्या भविष्यातील

कायमस्वरूपी होणा-या पुनर्भेटीचे!


बेभान कोसळणारा पाऊस बरा

निरभ्र करी नभांगण नील जलधिचे!!

करण्या स्वागत सज्ज पुन्हा तो

नव्या प्रकाश लहरींच्या उभा असे!


आठवणींचा जीवघेणा पाऊस मात्र

नेत्रांतून नकळतपणे पाझरत असे!!

शिडकावा अलगद ऊन पावसाचा

नापिक जमिनीवर पडावा तसा!

बीज अंगणात रूजवू न शकलेल्या

रांगोळीसाठी गृहिणींचा सडाच जसा!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational