आठवण
आठवण
क्षण पकडता येत नाहीत,
मोती,वगळुन जातात सारे,
आयुष्य पूढे जात आहे,
आठवणी ठेवुनिया.
ही वेळ, निघून जाते,
ना थांबते,ना पळते,
तिच्या वेगाने जाते,
आठवणी ठेवून जाते,
फूल फांदीवर हसते,
वेळ निघून जाते,
सारखी आठवण येते,
त्या नदीतिरावरची.
हा मळा फुलला होता,
तुरे डौलत होती,
गार वेली,ह़ोत्या,
उजाड माळ झाला,
वृक्ष निष्पर्ण झाला,
येईल का वसंत आता,
सांग मला.
तू कुठे मी कुठे,
नेत्रात पाणी दाटे,
आठवणींचा उर फुटे,
आता कधी फिरतील का दिवस,
सांग मला.
अशीच आठवण येऊदे,
किलबील जरा होऊदे,
पंख सावरेना झाले,
आता हे गगन, उंच गेले,
आठवणीने मन भरले,
सारे सारे.
