आठवण "दिवाळीची"
आठवण "दिवाळीची"
आली ही दीवाली दारात
सुवास पसरला घराघरात
केले लाडू शंकरपाळ्या
सोबत चिवडा चकल्या
नवनवीन कपडे गर्दी दुकानात
लहान मुलं ही सारी असती आनंदात
पाऊस चक्री लावून बार ते फोडतात
साऱ्या मित्रांसोबत आनंदाने डोलतात
मुंबईला राहणारे मोठ्या हौसेने गावी जातात
गावची मज्जा सारी पाहून थोडेफार रमतात
परतीच्या प्रवासाला गावच्या आठवणी आणतात
थोडेतरी त्यांचे डोळे आठवणीने पाणावतात
