STORYMIRROR

Vivek Kobnak

Action Others

2  

Vivek Kobnak

Action Others

चिंब भिजावेसे वाटले

चिंब भिजावेसे वाटले

1 min
76

सुरुवात पावसाची अचानक झाली

त्या पावसात एक बाहुली चिंब नहाली 

वाटत होतं तिच्यासोबत पावसात भिजावं

तिचं माझं काहीसं थोडंफार शिजावं


पण तिच माझं जमेल असं नव्हतं मला भासत 

कारण पावसात ती होती एकटीच हसत

शायद तिचही असावं कोणी मोरासारखं दिसणारं

तिच्यासाठी पावसात पिसारा फुलवून हसणारं


अचानक तिची नजर माझ्यावर पडली

तिची नी माझी नजर आजरेला भिडली

दुसरे विचारच निघून गेले तीने पाहताच मला

अनं चिंब भिजलेली असताना मी पहिले तिला 


पावसाचे थेंब पसरले तिच्या गाली

त्या थेंबांसोबत पुसट झाली तिची लाली

मधेच ऊन पडून इंद्रधनुष्य नटलं

आणि मलाही तिच्यासोबत भिजावंसं वाटलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action