माझ्या गावाचं नांव गाजुदे
माझ्या गावाचं नांव गाजुदे
"केलटे गावाचं नांव गाजुदे
साऱ्या क्रिकेट च्या मैदानावर"
अनेक गावे इथे उतरली क्रिकेट च्या वाटेवर
माझ्या गावाचं नांव गाजुदे साऱ्या क्रिकेट च्या मैदानावर
मजबूत संघ निर्माण केला खेळाडूंच्या जोरावर
विजयासाठी मेहनत केली त्या पोरांनी मैदानावर
एकजुटीने खेळ खेळले भरवसा ज्या संघावर ||1||
हिम्मत येते आमच्यामध्ये जुना खेळ दिसल्यावर
असा नव्याने निर्माण करा संघ आमचा विजयावर
पुन्हा जिंकून राज्य करतील क्रिकेट च्या हंगामावर ||2||
