आता जाईन वारीला
आता जाईन वारीला
कर्तव्यांची पूर्ती केली
नोकरीही पूर्ण केली
आता मिळाली उसंत
विचारांची दाटी झाली
कोण जाई पर्यटना
स्थळे बघण्या विविध
कोणी समुद्र किनारी
लाभावया मनस्वास्थ्य
हाका येती अनाथांच्या
रडे रोज परित्त्यक्त्या
कुणी मागे औषधाला
कुणी महाग जेवण्या
थोडे तरी सकलांना
प्रेमभरे सावरते
अश्रू तयांचे पुसूनी
दोन घास भरवते
होता इतिकर्तव्यता
दृष्टी वळे पंढरीला
आस मनास लागली
आता जाईन वारीला
