आसमंती घे भरारी....
आसमंती घे भरारी....
आसमंती घे भरारी
नको बाळगू संकोच
धेय्य उरी ठेवणारा
यशंवत जगी तोच.....१
नारी तुझ्या कर्तृत्वाने
बदलून टाक दिशा
चपळता दाखवून
नैराश्येची सोड निशा.....२
बाहुतल्या बलापेक्षा
बुद्धी बनव सशक्त
केंद्रबिंदू मन तुझे
ज्ञानोदयी असो रक्त......३
भावनिक होती काल
पिंजऱ्यात अडकली
पाश नसावे बंधन
मुक्त वाट पकडली........४
नारी रोज घे भरारी
नभ तुझे मालकीचे
कर्तबगारीचे रंग
पेर जीवनी मुक्तीचे.........५
