आशेवर जगतोय
आशेवर जगतोय
येशील तू जीवनात
या आशेवर जगतोय
तुझ्या वाटेकडे
टक लावून बघतोय || 0 ||
काही आवाज झाला
तर तू आलीस वाटतं
पुन्हा गतकाळात जातो
मनात तुझं प्रेम दाटतं
तुझ्याविण मी प्रत्येक
क्षणी खंगतोय
तुझ्या वाटेकडे
टक लावून बघतोय || 1 ||
जीवनाच्या पिंजऱ्यात
बंद मी कैदी
गती संपलेला
मंद मी कैदी
मनात आग जळतेय
मी धगधगतोय
तुझ्या वाटेकडे
टक लावून बघतोय || 2 ||
का तुझ्यासाठी
जीव तडफडतो
हाच कित्ता का
पुन्हा पुन्हा घडतो
मनाची तडफड
मी तगमगतोय
तुझ्या वाटेकडे
टक लावून बघतोय || 3 ||