आशा...!
आशा...!


जाता जाता रंग उधळले
रविराजाने पूर्व क्षितिजावर
मावळतीला जातानाही
हास्य खुलले अवखळ नभावर
तेज फुलते अंगावर घेऊन
वायदा उद्याचा केला
पहाट पारी येतो म्हणुनी
क्षितिजाआड क्षणात झाला
संध्या छाया पसरली
काळवंडून आले नभांगण
जे लाभले नशिबाने आम्हास
ते जणू निसर्गाचे एक मौलिक आंदण....!