STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

4  

Manisha Awekar

Tragedy

आर्त प्रेमविराणी

आर्त प्रेमविराणी

1 min
460

उद्ध्वस्त प्रेमदुनिया

सारे विखरुनी गेले

छळतात काळजाला

हळवेच भास सारे


तो शांत नदीकिनारा

वाहती मंदसे वारे

वाटे तुझा इशारा

हळवेच भास सारे


ओसंडे हा प्रपात

आघात तनामनात

जलबिंदू या मनाला

छळतात काळजाला


ते प्रेमबंध विरले

नुरले आता तराणे

आता आर्त विराणी

दुःखार्त हृदयी गाणी


गोड वचने प्रेमाची

गेली अधरी विरुन

गोड तरल वचनांची

गेली आसवे झरुन


ये रे सख्या आता तू

पुसूनीच भूतकाळ

दोघे भविष्य घडवू

विरुनीच सर्व भास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy